हरिश्चंद्रगड : प्रत्येक ट्रेकरचा पहिलं प्रेम असलेला ट्रेक...ह्या ट्रेकमध्ये काय मजा आहे हे तो ट्रेक केल्याशिवाय नाही कळणार..मलाही ब-याच दिवसांपासुन हा गड खुणवत होता पण संधी साधता येत नव्हती ..आणि अगदी अचानक योग जुळुन आला तो असा...
त्याचे झाले असे की ट्रेकच्या आदल्या रविवारी २८ जूनला माझा जुना चाळकरी शेजारी राजेश लोंढेचा व्हॅटसपवर निरोप आला आणि त्यात बायकोही तयार झाली मग काय विचारताय .... लगेच होकार कळवला ..
सुरुवात :
२ दिवसांचा ट्रेक म्हणून शुक्रवारी घरुनच ऑफिसचे काम करायचे ठरवले शनिवारी दुपारची ट्रेन पकडायची ठरल्याने सकाळ जरा आरामातचं झाली. सकाळ आवरता आवरता लक्षात आले कि अजून ट्रेक साठी बॅग आणि शूज घ्यायचे बाकी आहेत ..मग काय गाडीवरून धावत धावत बॅग , टॉर्च आणि इतर सामान झाले..पण ह्या गडबडीत शूज घायचेच राहिले .. राजेशने ३:१०ची कसारा लोकल पकडायची असा सांगितलं होतं त्यामुळे पटकन जेवून बाहेर पडलो पण त्यातही २:४५ होऊन गेले.. रिक्षा पकडून बसल्यावर पहिले तर २:५०झाले होते ..ट्रेन चुकणार म्हणुन माझी चिडचिड होत होती..प्राजक्ता (बायको ) रिक्षा चालकाला गाडी कशी पळावायची त्याचे धडे देऊ लागली ..३:०८ ला कशीबशी रिक्षा ठाणे स्टेशनच्या समोर थांबली... मी पैसे देईपर्यंत प्राजक्ता धावत पुढे गेली.आणि मग मीही समोरून येणाऱ्या रिक्षा चुकवत धावायला लागलो..ट्रेन प्लॅटफॉर्म २ ला येणार होती हे नशीब म्हणून स्टेशनवर आणि गाडी आली ..आम्ही दोघांनी धावत धावतच गाडीत एकदाची उडी मारली.. शनिवारी दुपारची ट्रेन असूनही जागा मिळाली हे नशीब बलवत्तर म्हणूनच..
थोडा दम खाईपर्यंत ट्रेनने कळवा क्रॉस केलं . मग लक्षात आलं कि ह्या गडबडीत तिकिट काढायचे आम्ही विसरुनच गेलो होतो .... मग काय कसारा येईपर्यंत टी. सी. येऊ नये ह्याची प्रार्थना करता राहिलो ..
ह्या दरम्यान राजेशचा फोन लागत नव्हता त्यामुळे तो कुठे आहे..येतोय कि नाही हे कळायला मार्ग नव्हता . तरी त्याने मला व्हाट्सअँप ग्रुप मध्ये घेतले असल्यामुळे इतर लोक ह्याच ट्रेन मध्ये असल्याचे समाधान जाणवले ... कल्याण ला असताना राजेशने फोन करून तो बसने निघाला असून घोटीला भेटेल असं कळवलं .. मग कसाऱ्याला अजून तासभर आहे असं पाहून आम्ही उभयंता निद्राधीन झालो.. ते थेट कसारा येईपर्यन्त ..
ओळखपरेड आणि प्रवास :
मजल दरमजल करत ट्रेन कसाऱ्याला ५:१५ च्या दरम्यान पोहोचली . ग्रुपचा लीडर देवदत्तला फोन केला ..तो मधल्या इंडिकेटरजवळ वाट बघत होता ..आम्हीही हळुहळु तिकडे निघालो ..त्यादरम्यान गैरसमजाने दुसरेच कुठले तरी जोडपे देवदत्तला भेटले. आणि योगायॊग इतका कि त्यांच्याही राजेश नावाच्या मित्राने त्यांना देवदत्तला कसारा स्टेशनवर भेटायला सांगितले होते कारण त्या राजेशचीही ट्रेन चुकली होती. .. त्या जोडप्यातल्या सौ ने त्यांच्या राजेशला फोन करून देवदत्तला दिला आणि मग कळले कि त्यांचा तो राजेश दोंदे होता आणि आमचा राजेश लोंढे होता.. नशीब आमचा कि आम्ही येईपर्यन्त हा गैरसमज वेळीच दूर झाला नाहीतर देवदत्त त्यांना घेऊन निघालाच होता ..... आम्ही देवदत्तला भेटलो आणि मग हा सगळा प्रकार ऐकताना आमची सगळ्यांचीच हसूनहसून पुरेवाट झाली.
मग देवाने (देवदत्त चा देवा ) स्वतः ची ओळख राजेश शाळेतला मित्र अशी करताच मी चमकलोच कारण राजेश आणि मी चाळकरी मित्र तसेच राजेश आणि माझी मोठी बहीण वर्गमित्र .. तिचे नाव सांगताच देवानेही ओळखले आणि मग आम्ही अनोळखी पासून शाळकरी झालो ..अशारितीने अगदीच नव्या ग्रुप मध्ये मी,प्राजक्ता,राजेश आणि आता देवा असे चार शाळकरी भेटलो .. मग ओळख परेड झाली ..त्यात दीपिका , अपेक्षा ,अरुण, क्रिष्णा (सगळे वकील आहेत ..गरज पडल्यास सांगा ) , प्रशांत आणि ... हे नवे मित्र भेटले ..
देवा आधीच जीप ठरवली होती ..त्याने आम्ही पाचनई ह्या गावी जाणार होतो.
जीप मध्ये सगळं सामान आणि माणसं भरून आम्ही कसाऱ्यावरून निघालो . मध्ये घोटीच्या अलीकडे घाटनदेवीच्या मंदिराजवळ पहिला थांबा घेतला.. आणि कॅमरा सुरू केला ..
कसाऱ्याचा घाट सुरु झाल्यावर आमच्या ड्राइव्हरने नेहमीची वाट असल्याने चांगलाच वेग पकडला होता. घोटीच्या टोल नाक्यापुढे उजव्या बाजूला वळून

No comments:
Post a Comment